'ईडी'चे आरोप चुकीचे आणि तथ्यहीन : मेहुल चोक्सी

Mehul Choksis video message ED allegations False and Baseless
Mehul Choksis video message ED allegations False and Baseless

अँटिग्वा : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीने अँटिग्वातून एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले, की सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेले आरोप चुकीचे आणि तथ्यहीन आहेत. 

'ईडी'कडून जे आरोप लावण्यात आले आहेत, ते चुकीचे आणि तथ्यहीन आहेत. त्यांनी माझ्या मालमत्तांवर कोणत्याही पुराव्यांविना कारवाई केली. ही कारवाई बेकायदेशीर आहे, असे मेहुल चोक्सीने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने चोक्सीला दिलेल्या प्रश्नावलीमध्ये त्याने यावर प्रतिक्रिया दिली. भारतीय अधिकाऱ्यांकडून चोक्सीचा पासपोर्ट निलंबित करण्याबाबत कारवाई केली जात आहे. विभागीय पासपोर्ट कार्यालयाने माझा पासपोर्ट का निलंबित केला, याबाबतची माहिती अद्याप मला दिलेली नाही. माझ्या सुरक्षेला भारतात धोका होता. तरीही माझा पासपोर्ट निलंबित करण्यात आला. त्यामुळे शरण येण्याबाबत प्रश्नच निर्माण होत नाही, असेही चोक्सीने स्पष्टीकरण दिले.  

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेत सुमारे 13 हजार 600 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी हिरेव्यावसायिक नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक असलेल्या मेहुल चोक्सी यांच्यावर या गैरव्यवहारचे आरोप ठेवण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com