मेहुल चोक्‍सीचे अँटिग्वात पलायन 

Mehul Choski's  run away from Antigua
Mehul Choski's run away from Antigua

नवी दिल्ली (पीटीआय) : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्‍सी याने अमेरिकेतून अँटिग्वाला पलायन केले आहे. त्याने अँटिग्वाचे स्थानिक पारपत्र मिळवले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. 

हिरे व्यापारी मेहुल चोक्‍सी याच्याविरोधात इंटरपोलने एक नोटीस बजावली आहे. या नोटिशीमुळे अँटिग्वातील यंत्रणांनी भारत सरकारला माहिती दिली आहे. चोक्‍सी हा या महिन्यात अँटिग्वात पोचला. त्याने तेथे स्थानिक पारपत्र घेतले आहे. चोक्‍सी हा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतातून पळून गेला होता. 'पीएनबी' गैरव्यवहारात चोक्‍सीसह त्याचा भाचा नीरव मोदी प्रमुख आरोपी आहे. या गैरव्यवहाराशी निगडित दोन खटल्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

मुंबईतील विशेष न्यायालयाने चोक्‍सीविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. या वॉरंटच्या आधारे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चोक्‍सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची मागणी इंटरपोलकडे केली होती. मात्र, ही मागणी अद्याप प्रलंबित आहे. नीरव मोदी आणि त्याचा भाऊ निशल यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com