मेलानिया रमल्या मुलांच्या सहवासात

नवी दिल्ली - अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
नवी दिल्ली - अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

नवी दिल्ली - चिमुकल्या हातांनी लावलेला कुंकुमतिलक, गळ्यात झेंडूचे हार आणि चेहऱ्यावरील ते निरागस हास्य... अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांचे हे रूप दिल्लीच्या मोतीबागेतील नवोदय सर्वोदय बालविद्यालयातील उपस्थितांना भुरळ घालणारे ठरले. दिल्ली सरकारने सुरू केलेल्या सरकारी शाळांतील आनंदाच्या वर्गाचे (हॅपिनेस क्‍लास) प्रत्यक्ष स्वरूप पाहून अमेरिकेच्या फर्स्ट लेडी भारावून गेल्या होत्या.

दिल्ली सरकारने सरकारी शाळांचे रूपडे बदलून टाकताना या शाळांतील दर्जा सुधारण्यासाठी भरीव प्रयत्न केले. शाळांची सुरुवातच ‘हॅपिनेस क्‍लास’ने करण्याचा पायंडा पाडला. त्यामुळे दिल्लीतील शाळांच्या सुधारणांबाबत जगभरात चर्चा झाली. त्यामुळेच मेलानिया यांनीही दिल्लीतील शाळा पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मोतीबाग भागातील सर्वोदय विद्यालयाला त्यांच्या भेटीचा कार्यक्रम आखण्यात आला.

या वेळी उपस्थित राहण्यास परवानगी नाकारण्यात आलेले मुख्यमंत्री ‌अरविंद केजरीवाल व दिल्लीतील शाळा सुधारणा कार्यक्रमाचे जनक उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सकाळीच ट्‌विट करून अमेरिकेच्या फर्स्ट लेडीचे शाळांत स्वागत केले. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी शाळेचे आवार सजविण्यात आले होते. प्रत्येक वर्गात त्यांच्या स्वागताचे संदेश लिहिण्यात आले होते. मेलानिया शाळेच्या आवारात येताच चुन्नी-घागरा या भारतीय वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांना कुंकुमतिलक लावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com