Rahul Gandhi MP Status : राष्ट्रवादीच्या लोकसभा सदस्याची खासदारकी पुन्हा बहाल; राहुल गांधींनाही...

Rahul Gandhi and mohammad faisal
Rahul Gandhi and mohammad faisal

Rahul Gandhi MP Status: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वीच लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने बहाल केले आहे.

लोकसभा सचिवालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. राहुल गांधी यांचीही खासदारकी एका गुन्ह्यात शिक्षा झाल्यामुळे रद्द झाली आहे. त्यामुळे राहुल यांची खासदारकीही अशाच प्रकारे पुन्हा बहाल होणार का, अशा चर्चा सुरू झाली आहे.(Latest Marathi News)

Rahul Gandhi and mohammad faisal
AAP News : ठाकरेंची सांत्वना करणाऱ्या केजरीवालांच्या 'आप'चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात?

दोषी आढळून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर फैजल यांनी दोन महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आजच सुनावणी होणार आहे. फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याची मागणी केलेली आहे.

फैजल यांना खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळेच त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते, पण केरळ उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली होती, असे असतानाही लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अपात्रतेचा निर्णय मागे घेतला नव्हता. त्यामुळे फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा आदेश मागे घेण्याची आणि लोकसभेचे सदस्यत्व बहाल करण्याची मागणी केली होती. (Marathi Tajya Batmya)

Rahul Gandhi and mohammad faisal
Govind Pansare Murder Case: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; तपासयंत्रणेच्या हाती नवे धागे दोरे

13 जानेवारी रोजी, मोहम्मद फैजल यांना गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा महासचिवांनी त्यांना अपात्र घोषित करणारी अधिसूचना जारी केली होती.

दरम्यान राहुल गांधी यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे गुजरात उच्च न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारी रद्द करत ८ वर्षे त्यांना निवडणूक लढविता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राहुल यांनी सुनावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुल यांची खासदारकी पुन्हा बहाल होती का? हे पाहावं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com