कर्नाटकातील निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ..

मंगळवार, 15 मे 2018

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप तसेच अन्य सोशल मीडिया प्लॅटफोर्म्सवर या ट्रेंड्सनी चांगलीच धमाल उडवली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेली आघाडी व यापूर्वी सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसला मिळालेली पिछाडी असे चित्र समोर येत असून कर्नाटकच्या जनतेने भाजपला कौल दिल्याचे कळते.

याचीच संधी साधून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. नरेंद्र मोदींचे यश, राहुल गांधींचा पराभव या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून नेटकऱ्यांनी मजेशीर विनोद, व्हिडीओ, मीम्स व्हायरल करायला सुरवात केली आहे. 

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप तसेच अन्य सोशल मीडिया प्लॅटफोर्म्सवर या ट्रेंड्सनी चांगलीच धमाल उडवली आहे. सकाळी काही काळासाठी काँग्रेसने आघाडी घेतली होती, मात्र काही क्षणातच हे चित्र पालटले व भारतीय जनता पक्ष हा काँग्रेस व जनता दलाला मागे टाकत पुढे निघून गेली. याचे जोक्स सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होताना दिसत आहेत.

असेच काही व्हायरल झालेले जोक्स आणि मीम्स -

- सबसे छोटा नारा .......

15 मई कांग्रेस गई

 

- एकदा विश्वेश्वरय्या म्हणता नाही आल म्हणून अस करत्यात व्हय 
                         -  राहुल गांधी

 

PARLE G

 

 

 

 
 

 

 

 

Web Title: memes viral on social media regarding karnatak elections