महिलांपेक्षा पुरुषांचे वजन लवकर घटते

वृत्तसंस्था
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : लठ्ठपणा हा आता सार्वत्रिक झाला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक लठ्ठ व्यक्ती दिसतात. लठ्ठ होण्याचा कारणे वेगवेगळी असली जाड माणूस हा चेष्टेचा विषय ठरत असल्याने अशा माणसांमध्ये न्यूनगंड, नैराश्‍य दिसून येते. महिलांमध्ये हो प्रमाण जास्त असते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम, डाएट, औषधे असे अनेक उपाय स्त्री-पुरुष करतात. यात महिलांपेक्षा पुरुषांचे वजन लवकर कमी होते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

वजन कमी झाल्यानंतर तंदुरुस्त पुरुषांनी आरोग्याचे अनेक फायदे होतात. "डायबेटिस, ओबेसिटी अँड मेटाबोलिझम' या विषयावरील नियतकालिकात वजन कमी करण्याबद्दलचा लेख नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील बावीसशे स्थूल व्यक्तींची पाहणी यासाठी करण्यात आली. या सर्वांना मधुमेहाचा त्रासही होता. शरीरातील साखरेचे प्रमाण किंचित जास्त असल्याचे आढळून आले. सुमारे आठ आठवडे हे सर्वेक्षण चालले. या प्रौढांना 800 उष्मांकाचा (कॅलरी) आहार देण्यात येत होता.

यात सूप, कमी उष्मांकाच्या भाज्या, गरम कडधान्ये यांचा समावेश होता. या अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात पुरुषांचे वजन घटण्याचे प्रमाण महिलांपेक्षा 16 टक्के जास्त असल्याचे दिसून आले. महिलांचे वजन सुमारे 22 पौडाने कमी झाले तर पुरुषांचे 26 पौडाने कमी झाल्याचे आढळून आले. या शिवाय 35 टक्के स्त्री-पुरुषांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य झाली होती. 

पुरुषांची शारीरिक ठेवण महत्त्वाची 

महिलांपेक्षा पुरुषांचे वजन लवकर कमी झाल्याचे कारण म्हणजे पुरुषांची शारीरिक ठेवण महत्त्वाची असते. यामुळे चरबी लवकर कमी होते. त्यांच्या स्नायूंचे वजन कमी असते व चयापचयाचे प्रमाण नैसर्गिकपणे जास्त असते. स्नायूंचे वजन कमी असले की उष्मांकाचे ज्वलन जास्त प्रमाणात होते. यामुळेच पुरुषांचे वजन महिलांपेक्षा जास्त कमी होते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men weight decreases faster than women