बलात्कारातील आरोपीला वकिलांकडून न्यायालयात मारहाण

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जुलै 2018

एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कारप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींना न्यायालयात सुनावणीसाठी महिला न्यायालयात दंडाधिकारी यांच्यासमोर आणण्यात आले होते. त्यादरम्यान वकिलांच्या एका गटाने यातील सर्व आरोपींना मारहाण केली. 

चेन्नई : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी न्यायालयात सुनावणीसाठी जाणाऱ्या 17 आरोपींना वकिलांकडून न्यायालयात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना तमिळनाडूच्या चेन्नई येथे घडली. या आरोपींना स्थानिक वकिलांनी न्यायालय परिसरात मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
 
एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कारप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींना न्यायालयात सुनावणीसाठी महिला न्यायालयात दंडाधिकारी यांच्यासमोर आणण्यात आले होते. त्यादरम्यान वकिलांच्या एका गटाने यातील सर्व आरोपींना मारहाण केली. न्यायालय परिसरात फरफट नेण्यात आले. त्यानंतर या आरोपींच्या पोटावर लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली. यातील 17 आरोपींनी 11 वर्षीय मुलीवर 7 महिन्यांच्या कालावधीत लैंगिक अत्याचार केला. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान, 11 जणांनी मुलीचा विनयभंग केला. तसेच यामध्ये आणखी 6 जणांचा समावेश असून, त्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. या सर्व 17 जणांची ओळख पटली आहे. पीडित मुलीने संशयित आरोपींना ओळखले असून, यातील चौघांनी पीडित मुलीवर हल्ला केल्याचे कबूल केले तर इतर दोघांनी विनयभंग केल्याचे सांगितले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 
 

Web Title: Men who allegedly raped 11 year old girl in Chennai thrashed in court