...म्हणून लोकसभेत काँग्रेसचा पराभव झाला- आनंद शर्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जून 2019

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवाचे कारण दिले आहे. शर्मा यांनी म्हटले आहे की, राजद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आणि लष्कराला देण्यात आलेल्या विशेष अधिकारांमध्ये (अस्फ्पा) बदल करण्याचं आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यातून दिल्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवाचे कारण दिले आहे. शर्मा यांनी म्हटले आहे की, राजद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आणि लष्कराला देण्यात आलेल्या विशेष अधिकारांमध्ये (अस्फ्पा) बदल करण्याचं आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यातून दिल्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे.

काश्मीरमधील तैनात असलेल्या सैन्याच्या संख्येत कपात करण्याचं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून देण्यात आलं होतं. हा संदर्भ देत शर्मांनी बालाकोट एअर स्ट्राइकवर भाष्य केलं. 'पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपनं राष्ट्रवादाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला. भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला असल्याचेही त्यांनी मान्य केले.

निवडणूक निकालानंतर पक्ष संकटात सापडल्याची कबुलीही शर्मा यांनी दिली. तसेच, निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष संपणार नाही. त्यामुळे पक्ष संघटनेत नेमक्या काय त्रुटी आहेत, याचा शोध आवश्यक असल्याचेही शर्मा यांनी म्हटले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवातून काँग्रेस पक्ष अद्याप सावरलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mention of sedition, Afspa in manifesto Congress says anand Sharma