Mera Jawan Sabse Majboot : लष्करी जवानांच्या वीरतेचे राजकीय भांडवल नको

Mera Jawan Sabse Majboot is top twitter trend
Mera Jawan Sabse Majboot is top twitter trend

पुलवामा येथे भारतीय लष्करावर झालेला दहशतवादी हल्ला आणि भारताने त्यानंतर दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला दिलेली चपराक यावर भारतात राजकारणाचा सावट यायला सुरवात झाली असल्याची परिस्थिती आहे. यासंबंधीच 'मेरा जवान सबसे मजबूत' (#MeraJawanSabseMajboot) हा ट्रेंड सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. 

भारतीय हवाई दलाने बालाकोटवर केलेल्या हवाई हल्ल्यांबाबत आक्रमक वक्तव्ये न करण्याची किंबहुना अधिकृत प्रवक्ते वगळता अन्य नेत्यांना काहीही न बोलण्याची व बोलल्यास अत्यंत काळजीपूर्वक बोलण्याची तंबी भाजप नेतृत्वाने स्वपक्षीय मंत्री, आमदार, खासदारांसह अन्य नेत्यांना दिली आहे. तरीही पक्षाचे मंत्री व नेते आगाऊ बोलण्याचे थांबत नाहीत हा अनुभव आहे. आता त्यातच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 'भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांमुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने वारे वाहत असून, आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपला 28 पैकी 22 जागा मिळतील,' हे वक्तव्य केले आहे.

याशिवाय, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुलवामा हल्ला झाल्यानंतर कॉर्बेट उद्यानात चित्रपटाचे शूटींग करत होते. तर एअर फोर्सवर काल (ता. 28) जेव्हा हल्ला झाला तेव्हा मोदी हे खेलो इंडिया अॅप लाँन्च करत होते.' अशा आशयाच्या पोस्ट सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहेत. यामुळेच देशाच्या लष्करी जवानांच्या वीरतेचे राजकीय भांडवल करुन येत्या निवडणूकीसाठी त्याचा वापर करत असल्याची टिका या ट्रेंड द्वारे करण्यात येत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com