esakal | भाजपने आपली लायकी दाखवली; जय शहा यांच्या ACC वरील निवडीवरुन राहुल गांधींची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

RAHUL GANDHI AND JAY SHAH.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे

भाजपने आपली लायकी दाखवली; जय शहा यांच्या ACC वरील निवडीवरुन राहुल गांधींची टीका

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. जय शहा आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजमुल हसन यांची जागा घेतील. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. बीजेपीच्या स्टाईलची हीच योग्यता आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. 

भाजप वारंवार गांधी कुटुंबीयांवर टीका करत असते. परिवारवादाच्या मुद्द्यावरुन भाजपने अनेकदा काँग्रेसला घायाळ केले आहे. आता राहुल गांधींनी हाच मुद्दा पकडत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. जय शहा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत. राहुल गांधी यांनी एका वृत्तस्थेने दिलेली बातमी शेअर करत 'Meritocracy BJP style' भाजपच्या योग्यतेची स्टाईल, असं म्हटलं आहे.

शरद पवारांचा मोदी सरकारला टोला ते म्यानमारमध्ये लष्करी राजवट, ठळक बातम्या वाचा...

जय शहा यांना शुक्रवारी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. वयाच्या 32 व्या वर्षी जय शहा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. ते सर्वात कमी वयाचे खेळ प्रशासक झाले आहेत. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) नवा अध्यक्ष निवडण्यात आला. 

दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना 19 सप्टेंबर 1983 साली झाली होती. या संस्थेचा उद्देश आशियामध्ये क्रिकेटला खेळ म्हणून विकसित करण्याचा होता. एसीसीला इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिलकडून (ICC) मान्यता प्राप्त आहे. भारत पाकिस्तानसह 25 देश ACC चे सदस्य आहेत.