मोदीजी तमिळ संस्कृती बेदखल करू नका: राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली - दक्षिणेतील सुपरस्टार विजय याने त्याच्या 'मर्सेल' या चित्रपटात जीएसटीविरोधात टिप्पणी केल्याने भाजपकडून तो संवाद हटविण्याची मागणी होत आहे. यावरून दक्षिणेत विजयला पाठिंबा मिळत असून, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना दक्षिणेत चित्रपट ही संस्कृती असून, तमिळी नागरिकांचा स्वाभीमान बेदखल करू नका.

भाजपने नुकतेच ताजमहाल हा हिंदुविरोधी असल्याची टीका केली होती. आता तमिळ सुपरस्टार विजय याने त्याच्या चित्रपटात 'मर्सल' चित्रपटांमध्ये जीएसटी करप्रणालीवर टीकात्मक संवाद केल्याने चर्चांना उधाण आले आहे. ख्रिश्चन कथानक असलेला चित्रपट आहे असा आरोप तमिळ भाजप नेत्यांनी केला आहे. तसेच, विजय हा नेहमीच मोदींच्या धोरणाविरोधात असतो, असा आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपच्या तमिळनाडू प्रदेशाध्यक्षांनी चित्रपटांतील हे संवाद वगळण्याचे आवाहन केले आहे कारण यातुन जनतेमध्ये मोदींच्या डिजीटल इंडियाच्या संकल्पनेविषयी चुकीचा संदेश जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. दक्षिणेतील सुपरस्टार कमल हसन यांच्यासह अऩ्य चित्रपट कलाकारांनी विजयला याबद्दल पाठिंबा दर्शविला आहे. आता राहुल गांधींनीही या वादात उडी घेतली आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की मोदीजी चित्रपट हा तमिऴ भाषेचा आणि संस्कृतीचा गाभा आहे. ते एक व्यक्त होण्याचे माध्यम आहे. त्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करुन तमिळी स्वाभीमानाला बेदखल करू नका, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालू नका. कमल हसन यांनीसुद्धा विजयच्या बाजुने उभे राहत तो एक खऱ्या जीवनातील सुपरस्टार असल्याचे म्हटले आहे. त्याचे चित्रपट वस्तुस्थितीवर भाष्य करणारे असतात. त्यामुळे त्याला या चित्रपटांतुन कुठलाही संवाद वगऴण्याची आवश्यकता नाही. सेन्सॅार बोर्डाने प्रमाणित केलेले असताना परत कोणी सेन्सॅार बोर्ड बनुन चित्रपटावर टीका करण्याचे कारण नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com