‘इस्त्रो’कडून धातूची रिंग, गोळ्यांची पाहणी

संशोधनानंतरच होणार खुलासा
Metal rings Isro inspection bullets Revealed
Metal rings Isro inspection bullets Revealed sakal

चंद्रपूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’च्या दोन वैज्ञानिकांनी शुक्रवारी सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी आणि पवनपार या गावांना भेट दिली. आकाशातून पडलेले सहा गोळे आणि धातूच्या रिंगची पाहणी त्यांनी केली. सध्या पोलिस स्थानकात ठेवलेल्या या वस्तू ‘इस्त्रो’च्या वाहनातून तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.

लाडबोरी आणि पवनपार येथे शनिवारी (ता.२) आकाशातून वेगाने येणारे आगीचे गोळे विदर्भात अनेकांनी बघितले. यातील काही अवशेष त्या रात्री लाडबोरी ग्रामपंचायत भवनाच्या मागील परिसरातच पडले होते. अवशेषात आगीचे गोळे आणि धातूची रिंग होती.

संशोधनानंतरच होणार खुलासा

सापडलेले अवशेष उपग्रहाच्या रॉकेट बूस्टरचे असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्याचे ‘स्काय वॉच’चे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले आहे. मात्र, सिलिंडरमध्ये कोणते इंधन होते. ते नेमके कोणत्या देशाने सोडले हे प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर सांगता येईल, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले. हे अवशेष कोण्या देशाचे, कुणाची जबाबदारी हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. एका आठवड्यात यावर संशोधन करून निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com