#MeToo माझ्यावरील सर्व आरोप खोटे : एम. जे. अकबर

MeToo All the allegations against me are false says MJ Akbar
MeToo All the allegations against me are false says MJ Akbar

नवी दिल्ली : #MeToo मोहिमेंतर्गत केंद्रीयमंत्री एम. जे. अकबर यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर याप्रकरणी अकबर यांनी न्यायालयात धाव घेतली आणि त्यांनी न्यायालयात सांगितले, की माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत.

एम. जे. अकबर यांनी न्यायालयात दिलेल्या जबाबात सांगितले, की ''कोलकाता येथील बॉइज स्कूल आणि प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून मी शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी पत्रकारिता क्षेत्रात आलो. अत्यंत कमी कालावधीत 'संडे' नावाच्या एका पत्रिकेमध्ये संपादकपदावर रुजू झालो. 1983 मध्ये मी 'द टेलिग्राफ'ची सुरवात केली. त्यानंतर मी 1993 पर्यंत 'एशियन ऐज'चा संपादक होतो. त्यानंतर 'इंडिया टुडे'चा संपादक संचालक झालो. संपादकपदावर असताना अनेक पुस्तकं मी लिहिली''. 

ते पुढे म्हणाले, ''माझ्या प्रतिमेला धक्का पोचविण्यासाठी प्रिया रमानी या जाणूनबुजून माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. या खोट्या आरोपांमुळे मला मोठा धक्का बसला. जे आरोप करण्यात आले होते. ते कथित असून, 20 वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे मी वैयक्तिकरित्या न्यायालयात आलो आहे. त्यामुळेच मी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मी ज्या बाबी सांगितल्या आहेत, त्या सगळ्या बरोबर आहेत. मात्र, माझ्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत. ते चुकीचे आहेत''. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com