MeToo: तू खंबीर राहा आणि तुझं आयुष्य जग...

Swaroop Raj
Swaroop Raj

नवी दिल्लीः 'तुझ्या पतीने काहीही चुकीचे काम केले नाही. तू खंबीर राहा आणि तुझे आयुष्य जग. मी आता निर्दोष सुटलो तरी लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तसाच असेल,' असे आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहून ‘जेनपॅक्ट इंडिया’ या कंपनीत उपाध्यक्ष पदावर काम कऱणाऱ्या स्वरुप राज यांनी मंगळवारी राहत्या घरी आत्महत्या केली.

स्वरुप राज यांच्यावर कंपनीतील दोन महिला कर्मचाऱ्यांनी MeTooचे आरोप केले होते. कंपनीने स्वरुप राज यांची चौकशी करण्यास सुरवात केली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत राज यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. स्वरुप राज हे 2007 पासून कंपनीत काम करत होते. प्रोसेस डेव्हलपर म्हणून ते कंपनीत रुजू झाले होते. पुढे त्यांनी उपाध्यक्षपदापर्यंत झेप घेतली होती.

स्वरूप राज हे नोएडातील उच्चभ्रू परिसरात पत्नीसह राहात होते. घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहीली आहे. चिठ्ठीत पत्नी किर्लाती उद्देशून म्हटले आहे की, ‘हाय किर्ती, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हेच मी तुला सांगू इच्छितो. माझ्यावर दोन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले. पण, खरंच काही केले नाही. मी निर्दोष आहे. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल आणि मी निर्दोष असल्याचे जगाला कळेल. पण तोवर तू आणि कुटुंबीयांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. माझ्यावरील आरोप निराधार आहेत. पण आता हे संपूर्ण प्रकरण कंपनीमधील सर्वांना माहित आहे. मी, या लोकांच्या समोर आता जाऊ शकत नाही. तुझ्या पतीने काहीही चुकीचे काम केले नाही. तू खंबीर राहा आणि तुझं आयुष्य जग. मी आता निर्दोष सुटलो तरी लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तसाच असेल.'

दरम्यान, पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून, पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com