
- उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील घटना
सोनभद्र (उत्तर प्रदेश) : अनेक राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाची सुविधा पुरवली जाते. मात्र, यात अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एका शाळेत समोर आला आहे. एक लिटर दुधात एक बादली पाणी टाकून विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
चोपन ब्लॉक ग्राम पंचायतीच्या शाळेमध्ये बुधवारी विद्यार्थ्यांना खाण्यासोबतच दूध देण्यात आले होते. मात्र, या वेळी केवळ एक लिटर दूध 81 विद्यार्थ्यांना वाटून देण्यासाठी त्यामध्ये एक बादली पाणी मिसळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
चारचाकी वाहनांवर लावण्यात येणाऱ्या 'फास्टॅग'ला मुदतवाढ
मध्यान्ह भोजनात ठरल्यानुसार विद्यार्थ्यांना खाण्यासोबत 150 मिलिलिटर दूध देण्यात येणार होते. ग्रामपंचायतीच्या प्राथमिक शाळेत 171 विद्यार्थी शिक्षण घेतात. बुधवारी यापैकी 81 विद्यार्थी उपस्थित होते. परंतु या 81 विद्यार्थ्यांसाठी केवळ एक लिटर दूध पाठवण्यात आले.
पामेला अँडरसनचे पंतप्रधान मोदींना पत्र
प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्लास दूध मिळावे, यासाठी या दुधात एक बादली पाणी मिसळण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हादंडाधिकारी एस. राजलिंगन यांनी शाळेला भेट देत शिक्षक शैलेश कन्नौजिया यांना निलंबित केले. तसेच "शिक्षा मित्र' जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदवून त्यांना नोकरीवरून काढून टाकले