'राफेल'वर पुन्हा होणार सुनावणी?

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

राफेल करारप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला क्लिन चिट दिली. मात्र, या निकालाबाबत दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राफेल करार प्रकरणावर आता पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : राफेल करारप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला क्लिन चिट दिली. मात्र, या निकालाबाबत दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राफेल करार प्रकरणावर आता पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून 14 डिसेंबरला देण्यात आलेल्या निकालामध्ये राफेल करारात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्रुटी आढळल्या नाहीत, असे स्पष्ट करत या करारावर होणाऱ्या चौकशीची मागणी न्यायालयाने फेटाळली होती. मात्र, आता याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या 36 राफेल विमानांच्या करारासंदर्भात न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.  

दरम्यान, सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. के एम जोसेफ आणि न्या. एस के कौल यांच्या खंडपीठाने मागील वर्षी 14 डिसेंबरला या सर्व याचिकांवर निर्णय दिला होता. मात्र, त्यानंतर याबाबत दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकांवर सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Might be hearing again Rafale Deal