स्थलांतरित पक्ष्यांचीही गणना भाविकांमध्ये

पी. बी. सिंह/मतेंद्र कीर्ती
रविवार, 20 जानेवारी 2019

प्रयागराज : कुंभमेळ्यामध्ये दररोज लक्षावधी भाविक संगमावर स्नान करण्यासाठी येत असताना, येथे स्थलांतर करून आलेले सैबेरियन पक्षीही पवित्र स्नान करण्यासाठीच येत असल्याचे मानले जाते. 

प्रयागराज : कुंभमेळ्यामध्ये दररोज लक्षावधी भाविक संगमावर स्नान करण्यासाठी येत असताना, येथे स्थलांतर करून आलेले सैबेरियन पक्षीही पवित्र स्नान करण्यासाठीच येत असल्याचे मानले जाते. 

हे सायबेरियन पक्षी दर वर्षी याच कालावधीत संगमावर येतात. याच काळात कुंभमेळा असल्याने भाविक आणि पक्षी यांचा येथे येण्याचा कालावधी एकच येतो. हे पक्षी मार्च महिन्याच्या सुरवातीपर्यंत येथेच असतात, नंतर ते निघून जातात. कुंभमेळाही याच काळात संपतो. हे सर्व जुळून येत असल्याने साधू आणि भाविकांना नेहमी या पक्ष्यांचा थवा येथे पाण्यात डुबक्‍या मारत असताना दिसतो. त्यामुळे हे पक्षीदेखील भाविकच असल्याची त्यांच्यात श्रद्धा आहे.

भाविकांना पक्ष्यांची आणि पक्ष्यांना भाविकांची सवय झाल्याने भाविकांनी देऊ केलेले अन्न, प्रसाद खाण्यासाठी पक्षी न घाबरता त्यांच्या जवळ येतात. मनुष्य आणि पक्ष्यांमधील प्रेमाचे अनोखे उदाहरण येथे पाहावयास मिळते. 

Web Title: Migrationed Birds also counts in the devotees