लष्कर-ए-तयैबाच्या दहशतवाद्याला काश्मीरमध्ये कंठस्नान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नवी दिल्ली- लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवादी मुझफ्फर नाईकू अहमद ऊर्फ मुझ मौलवी याला आज (शुक्रवार) झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय सैन्याने कंठस्नान घातले आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यातील माचू परिसरात भारतीय लष्कर आणि पोलिसांसोबत दहशतवाद्यांची चकमक झाली. त्यामध्ये मुझफ्फरला ठार करण्यात सैन्याला यश आले आहे. सध्या अल-बद्र या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या मुझफ्फरचे लष्कर-ए-तैयबाशी संबंध होते. 

लष्कराने पोलिसांच्या साह्याने शुक्रवारी पहाटे सुरू केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत हा एक दहशतवादी मारला गेल्याचे वृत्त असून, याबाबतचा अधिक तपशील प्रतीक्षेत आहे. 
 
Web Title: a militant associated with lashkar killed in kashmir