भारतीय लष्कराचा दणका; 18 दिवसांत 18 दहशतवादी ठार!

भारतीय लष्कराचा दणका; 18 दिवसांत 18 दहशतवादी ठार!

जम्मू : जम्मू काश्मीरच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. कमांडर झाकीर मुसा असे खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

जम्मू-काश्मीर खोऱ्यात मागील 18 दिवसांपासून भारतीय सुरक्षा दलातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यामध्ये गेल्या 18 दिवसांत 18 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. झाकीर मुसाला झाकीर रशिद भट या नावानेही ओळखले जात होते. जम्मू-काश्मीरात झालेल्या अनेक दहशवादी कारवाईत त्याचा सहभाग होता. त्राल भागात काल (गुरुवार) झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. झाकीर मुसाला विशेष तपास यंत्रणांनी त्याच्या घराजवळ केलेल्या कारवाईत ठार केले.  

दरम्यान, मुसा घरी जात असताना त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. पण तो पळून जाण्याच्या मार्गावर होता. तो जवळच्या जंगलात लपून बसला. त्यानंतर झालेल्या चकमकीत त्याला ठार करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com