काश्मीरमध्ये मंत्र्याच्या घरावर हल्ला; शस्त्रास्त्रे पळविली

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

अनंतनाग जिल्ह्यातील दुरु येथे मंत्री फारुक अंद्राबी यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानी दहशतवाद्यांनी रविवारी रात्री हल्ला करत, पहारा देत असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सत्ताधारी पक्ष पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे (पीडीपी) आमदार फारुक अंद्राबी यांच्या घरावर रविवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, दहशतवाद्यांनी पोलिसांजवळील शस्त्रास्त्रे पळविली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील दुरु येथे मंत्री फारुक अंद्राबी यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानी दहशतवाद्यांनी रविवारी रात्री हल्ला करत, पहारा देत असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पोलिसांजवळील चार बंदुका पळवून नेल्या आहेत. जखमी पोलिसांनी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात अंद्राबी यांच्या कुटुंबातील कोणी जखमी झालेले नाही.

गोळीबार झाला तेव्हा अंद्राबी घरामध्ये नव्हते. या गोळीबारानंतर परिसरात शोध मोहिम राबविण्यात येत असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Militants attack J&K minister's home, snatch four weapons