पुलवामा : नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागातील नॅशनल कॉन्फरन्स नेत्याच्या घरावर आज (ता.2) दुपारी अतिरेक्यांनी हल्ला केला. 

जम्मू आणि काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागातील नॅशनल कॉन्फरन्स नेत्याच्या घरावर आज (ता.2) दुपारी अतिरेक्यांनी हल्ला केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोही उद्दीन मीर यांच्या मुर्रन येथील घरावर अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्ला केला. अतिरेक्यांनी टाकलेला बॉम्ब संरक्षण भिंतीच्या बाहेरच पडून फुटल्यानंतर त्यांनी घराच्या दिशेने गोळीबार केला.

हा हल्ला अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केला असून सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यास चोख प्रत्युत्तर दिले. आत्तापर्यंत कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Militants attacks on house of Nc leader in J&K