स्मार्टफोनच्या मदतीने शोधता येणार दुधातील भेसळ

स्मार्टफोनच्या मदतीने शोधता येणार दुधातील भेसळ

नवी दिल्ली- आयआयटी-हैदराबादमधील संशोधकांनी दुधातील भेसळ शोधून काढण्यासाठी कमी खर्चिक पर्याय शोधला आहे. स्मार्टफोनचा उपयोग करून येथील संशोधकांनी नवी यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे दुधातील भेसळ शोधण्याचा सोपा मार्ग उपलब्ध झाला असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

दुधातील आम्लाचे प्रमाण दर्शविणारा कागदसदृश पदार्थ आयआयटी-हैदराबादमधील संशोधकांनी तयार केला आहे. आम्लाच्या प्रमाणानुसार या कागदावरील रंगामध्ये बदल होतो. या विशेष तयार करण्यात आलेल्या कागदावरील रंगामध्ये झालेले सूक्ष्म बदल टिपण्यासाठी संशोधकांनी एक अल्गोरिदम तयार केला आहे, जे स्मार्टफोनच्या मदतीने काम करते. या यंत्रणेच्या मदतीने दुधातील भेसळ ओळखा येते.

संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व करणारे प्रा. शीव गोविंद सिंह यांनी सांगितले, की दुधातील भेसळ शोधून काढण्यासाठी क्रोमॅटोग्राफी (रासायनिक पृथःकरणाची पद्धत) आणि स्पेक्‍ट्रोस्कॉपी हे तंत्र वापरले जाते. मात्र, अशा प्रकारचे तंत्र वापरण्यासाठी मोठी आणि खर्चिक यंत्रणा उभी करावी लागते. या प्रकारचे तंत्र असलेले कमी खर्चिक आणि सहज वापरता येईल असे यंत्र तयार करणे अवघड आहे. त्यामुळे विकसनशील देशांमधील दूध ग्राहकांना जुन्या तंत्रात फारसा रस नाही. त्यामुळे सहज वापरण्याजोगे आणि कमी खर्चात तयार होणारे दुधातील भेसळ ओळखणारे यंत्र विकसित करण्यावर आम्ही भर दिला.

असे आहे नवे तंत्र 
संशोधकांनी प्रथम दुधातील आम्लाचे प्रमाण मोजण्यासाठी एक सेंसर चीप तयार केली. त्यानंतर आम्लाच्या प्रमाणानुसार रंगामध्ये बदल होईल असा कागदासारखा पदार्थ तयार करण्यात आला. इलेक्‍ट्रोस्पिनिंग प्रक्रियेतून या पदार्थाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर स्मार्टफोनसाठी एक अल्गोरिदम तयार करण्यात आला. ज्याचा वापर करून सेंसर चीप असलेला कागद दुधात बुडविल्यानंतर त्याच्या रंगातील बदल स्मार्टफोनच्या कॅमेरॉने टिपले जातात. त्यानंतर दुधातील आम्लाच्या प्रमाणाची माहिती (पीएच रेंज) आपल्याला स्मार्टफोनवर पाहता येऊ शकते, असे सिंह यांनी सांगितले. 

नव्या तंत्राद्वारे दुधातील भेसळ 99.71 टक्‍क्‍यांपर्यंत अचूकपणे ओळखता येऊ शकते, असा दावा सिंह यांनी केला असून, मोबाईलची लाइट आणि कॅमेऱ्याचा अधिक प्रभावी व अचूक कसा वापर करता येईल, यासाठी आमचे पथक प्रयत्न करत आहे. - प्रा. प्रा. शीव गोविंद सिंह, आयआयटी-हैदराबाद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com