‘यूपी’तून २१४ कोटींच्या भाज्या ब्रिटनला रवाना

‘यूपी’तून २१४ कोटींच्या भाज्या ब्रिटनला रवाना

लखनौ - देशभरात लॉकडाउन असल्याने शेतमालाच्या वाहतुकीवरही बंधने आली आहेत. अशा कठीण परिस्थितीतही उत्तर प्रदेशमधून ब्रिटनला प्रथमच भाजीपाला निर्यात करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी वाराणसीहून २१४ कोटी रुपयांच्या भाज्यांची निर्यात झाली आहे.

कोरोनातही कराराचे पालन
या खेपेत कानपूरमधून ३९ कोटी रुपये किमतीचा भाजीपाला पाठविला आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट’ (फियो) चे सल्लागार गर्ग म्हणाले की, कोरोनाव्हायरसच्या संक्रमण काळातही २०२०-२५ या काळासाठीच्या कृषि निर्यात कराराचे पालन करीत भाज्यांची पहिली खेप ब्रिटनला रवाना केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे मोठे संकट आहे. तेथे या साथीमुळे आत्तापर्यंत २० हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

५० प्रकारच्या भाज्या
ब्रिटनला भाज्या नेण्यासाठी ब्रिटिश एअरवेजचे विमान वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. पहिल्या टप्प्यात ५० प्रकारच्या भाज्या पाठविण्यात आल्या. त्यात १०१ कोटी रुपयांचे बटाटे आणि ८४ कोटी रुपयांचे कांदे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com