सौदी सरकारच्या निर्णयाचे मोदी घेत आहेत श्रेय: ओवेसी

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

सौदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मोदी श्रेय घेत आहेत. सौदी सरकारने तीन वर्षांपूर्वीच महरमशिवाय महिलांना हज यात्रेस येण्याची परवानगी दिलेली आहे. या निर्णयाचे श्रेय घेणे मोदींना शोभत नाही. त्यांनी परदेशी सरकारच्या निर्णयाचे श्रेय घेऊ नये.

नवी दिल्ली - सौदी अरेबिया सरकारने 45 वर्षांवरील मुस्लिम महिलांना महरमशिवाय हज यात्रेस येण्याची परवानगी दिलेली आहे. या निर्णयाचे नरेंद्र मोदी श्रेय घेत आहेत, अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

लोकसभेत तोंडी तलाकविरोधातील विधेयक मंजुरीपाठोपाठ आता हज यात्रेदरम्यान मुस्लिम महिलांसोबत होणारा भेदभाव संपविल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. मुस्लिम महिलांना हज यात्रेसाठी पुरुष पालकाच्या सोबतीची सक्ती करणारी टमहरम' ही प्रथा संपुष्टात आल्याची घोषणा पंतप्रधानांनी "मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाद्वारे आज केली. यावर बोलताना सौदी सरकारनेच हा निर्णय घेतल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे.

ओवेसी म्हणाले, की सौदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मोदी श्रेय घेत आहेत. सौदी सरकारने तीन वर्षांपूर्वीच महरमशिवाय महिलांना हज यात्रेस येण्याची परवानगी दिलेली आहे. या निर्णयाचे श्रेय घेणे मोदींना शोभत नाही. त्यांनी परदेशी सरकारच्या निर्णयाचे श्रेय घेऊ नये.

Web Title: MIM chief Asaduddin Owaisi trashes Narendra Modis claim on Haj journey of Muslim women