Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi

300 जागा जिंकल्या म्हणून मनमानी करू शकत नाही; ओवेसी

हैदराबाद : भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 300 हून अधिक जागा जिंकल्या म्हणजे ते मनमानी कारभार करू शकत नाहीत, असे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

हैदराबादमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींवर थेट निशाणा साधला. मुस्लिम बांधवांनी भाजपला घाबरू नये. या देशात आम्ही भाडेकरू नाही तर समसमान भागीदार आहोत. हिंदूंइतकाच आमचाही या देशावर अधिकार आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

ओवेसी म्हणाले, की भारताच्या पंतप्रधानांना माझे सांगणे आहे की संविधानाचा दाखला देऊन मी तुमच्याशी लढत राहीन. तुम्ही 300 जागा जिंकल्या असल्या तरी तुम्ही मनमानी कारभार करू शकत नाही. भाजपला घाबरण्याची मुसलमानांना काहीच गरज नाही. आम्ही या देशात काही मारेकरी म्हणून राहत नाही. तर या देशात भागीदार आहोत. जर मोदी मंदिरांमध्ये जाऊ शकत असतील तर मुसलमानही मशिदीत जाऊ शकतात. तो आमचा संविधानिक अधिकार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com