रामलिला मैदानावरून खाण अवलंबित आता जंतरमंतरवर 

विलास ओहाळ
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर दोन दिवस धरणे आंदोलन केल्यानंतर आज जंतरमंतरवर मुक्काम हलविला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून अवलंबितांनी धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे. 

गोवा खाण लोकमंचच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले असून, स्थानिक राजकीय नेत्यांसह दिल्लीतील केंद्र सराकारच्या घटक पक्षातील व विरोधी पक्षातील खासदारांनी हजेरी लावत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर काल शिवसेनेचे संजय राऊत यांनी पर्यायी संसद बंद पाडू, असा इशाराही दिला आहे. या खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर आणि खासदार नरेंद्र सावईकर यांनीही रामलिला मैदानावर उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर सभापती डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे आमदार नीलेश काब्राल, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी हजेरी लावली होती.

बुधवारी कॉंग्रेसचे माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रसाद गावकर, ऍड. रमाकांत खलप यांनीही उपस्थिती लावून अवलंबितांना पाठिंबा दिला.

Web Title: mine dependent is come to jantarmantar after ramlila ground