खनिज तेलाच्या भावाचा भडका 

यूएनआय
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

लंडन (यूएनआय) : अमेरिकेकडून कमी झालेला पुरवठा आणि इराणवरील निर्बंध यामुळे खनिज तेलाच्या भावात बुधवारी प्रतिबॅरल 1.52 डॉलरने वाढ होऊन तो 74.19 डॉलरवर गेला. हा खनिज तेलाच्या भावातील 8 ऑगस्टनंतरचा उच्चांक आहे. 

लंडन (यूएनआय) : अमेरिकेकडून कमी झालेला पुरवठा आणि इराणवरील निर्बंध यामुळे खनिज तेलाच्या भावात बुधवारी प्रतिबॅरल 1.52 डॉलरने वाढ होऊन तो 74.19 डॉलरवर गेला. हा खनिज तेलाच्या भावातील 8 ऑगस्टनंतरचा उच्चांक आहे. 

"अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट'ने (एपीआय) दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात अमेरिकेचे खनिज तेल उत्पादन 52 लाख बॅरलने कमी झाले आहे. विश्‍लेषकांनी आधी व्यक्त केलेल्या अंदाजाच्या तिप्पट घसरण उत्पादनात नोंदविण्यात आली आहे. अद्याप याबाबतची सरकारी आकडेवारी जाहीर झालेली नाही. "एपीआय'ची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे आज खनिज तेलाचा भाव वधारला. यामुळे तेलाच्या भावात प्रतिबॅरल 1.52 डॉलरने वाढ होऊन तो 74.19 डॉलरवर गेला. यातच आज डॉलरच्या भावात घसरण झाल्याने तेलाच्या भाववाढीचा झळ फारशी बसली नाही. 

तेल निर्यातदार देशांची संघटना "ओपेक'मधील इराण तिसऱ्या क्रमांकाचा मोठा तेल निर्यातदार देश आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने इराणकडून तेलपुरवठा कमी होणार आहे. यामुळे जागतिक पातळीवर तेलाचे भाव भडकण्याची शक्‍यता आहे. 

युरोपीय कंपन्यांची इराणकडून खरेदी कमी 
अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने युरोपीय तेल कंपन्यांनी इराणकडून तेल खरेदी कमी करण्यास सुरवात केली आहे. याचवेळी चीनमधील खरेदीदार यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

खनिज तेलाचा भाव 
प्रतिबॅरल : 74.19 डॉलर 

Web Title: Mineral oil price increase