गोवा - खाण समर्थकांनी पणजीत रोखला महामार्ग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

पणजी (गोवा) : १५ मार्चपासून गोव्यात खाण बंदी लागू झाल्याने संतप्त बनलेल्या खाणसमर्थकांनी आज पणजीत चक्का जाम आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग रोखला. यामुळे मांडवी पुलावर कोंडी झाली.

म्हापसा आणि मडगाव व वास्को विमानतळावर जाणारी वाहतूक खोळंबली. मांडवी नदीत बार्ज मालकांनी बार्ज (जहाज) नांगरून ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी खाण अवलंबित संघटनेशी बोलणी सरू केली आहे. खाण प्रश्नावर लवकर तोडगा काढून खाणी सुरू कराव्यात अशी त्यांची मागणी आहे.

गोव्यातील खाण व्यवसाय बंद पडल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांनी आज पणजी कदंब बसस्थानकावर आंदोलन छेडले आहे. स्थानकावर झालेल्या या गर्दीमुळे पवरी आणि मडगावला जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सध्या मडगावला जाणारे रस्ते रिकामे झालेले असून पर्वरीची परिस्थिती होती तशीच आहे. पुढे हे आंदोलक आझाद मैदानावर एकत्र जमणार असून आंदोलनाला व्यापक स्वरूप आले आहे.

Web Title: Mining supporters of Panaji stop the highway