गोव्यात नेतृत्व बदल आज नाही तर उद्या : श्रीपाद नाईक

Shripad Naik
Shripad Naik

पणजी : मुख्यमंत्र्यांची तब्येत पाहता राज्यात आज ना उद्या नेतृत्व बदल करावा लागेल, असे सांगत केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राजकीय चर्चेला वाट करून दिली. हे सांगतानाच त्यांनी पक्षातील नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आजारी व्यक्तीला विश्रांती ही मिळालीच पाहिजे. मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना राजकीय अपरिहार्यतेपोटी विश्रांती न घेता मुख्यमंत्री म्हणून काम करावे लागत आहे. नेतृत्व बदल ही गरज आहे याबाबत दुमत नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नाही तरीही त्यांना काम करावे लागत आहे.

भाजपच्या काही नेत्यांच्या मनात पक्षाने अन्याय केल्याचे विचार घोळत आहेत. त्या नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन मतभेद असल्यास ते मिटवण्यासाठी पुढाकार घेणार आहे असे सांगून ते म्हणाले, यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात आज ना उद्या नेतृत्व बदल करावा लागेल असेही ते म्हणाले,  भाजप ही शिस्तबद्ध पक्ष संघटना आहे. मतभेद झाल्यास ते मिटवण्याची पद्धत आहे. मी ज्येष्ठ नेता असल्याने आता मतभेद मिटवण्यासाठी मलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. पक्षाने बाहेरून नेते आणल्यावर असे होणे क्रमप्राप्त होते. मात्र राजकारणात काही गोष्टी या कराव्या लागतात. आताही पक्षाने काही निर्णय घेतले. काही निर्णयांची मलाही कल्पना दिली होती. 

भाजपने नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी काही उपाययोजना करणे सुरु केले अाहे. कोणी कोणाशी बोलावे हे ठरवले आहे. त्यानुसार बोलणी सुरु केली आहेत. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मांद्रे मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी आज संवाद साधला. त्या्ंनी पक्षविरोधी भूमिका घेऊ नये यासाठी हा प्रयत्न होता. मात्र तेंडुलकर यांनी संपर्क साधल्यानंतर याची लगेच माहिती माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यापर्यंत पोचवण्यात आली. यावरून पक्षाचे नेते आजही पार्सेकर यांच्यासोबत असल्याचे दिसते.

खाणकाम बंदीवरून मगोनेही डावपेचात आपण कमी नाही हे दाखवून देणे सुरु केले अाहे. खाणी सुरु करण्यासाठी भाजपच्या नेत्या्ंनी आजवर भरपूर प्रयत्न केले. आता सर्वपक्षीय शिष्टमंड़ळ दिल्लीला न्या अशी सूचना मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com