सध्या टेस्टचा नाही तर वन डेचा जमानाः अनंतकुमार

Minister Ananth Kumar
Minister Ananth Kumar

नवी दिल्लीः सध्या टेस्टचा नाही तर वन डेचा जमाना आहे, असे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत आज (शुक्रवार) म्हटल्यामुळे एकच हशा पिकला. भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे.

संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठरावामुळे आज मतदान होणार आहे. लोकसभा विरोधी पक्षांना बोलण्यासाठी 358 मिनिटांचा वेळ देण्यात आला. ज्यानंतर लोकसभेत एकच गदारोळ उडाला. काँग्रेसने वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यावेळी संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार उभे राहिले आणि म्हणाले, 'सध्याचा जमाना टेस्टचा नाही तर वन डेचा जमाना आहे.' अनंतकुमार यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मितहास्य केले.

सत्तेच्या चार वर्षांत पहिल्यांदाच मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आला असून आज यावर चर्चा होणार आहे. विरोधी गटातील कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तेलुगु देसम, सप या प्रमुख पक्षांची एकी कायम राहील. 'आप'नेही मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने केंद्र सरकारला धोका नसला, तरी कुंपणावर असलेले प्रादेशिक पक्ष नेमके कोणत्या बाजूला झुकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी कुंपणावरील पक्ष नेमके कोणाच्या बाजूने जातात, यालाही महत्त्व आले आहे.

लोकसभेत एकूण 544 जागा असून विद्यमान सदस्यसंख्या 534 इतकी आहे. बहुमतासाठी 268 ची आवश्‍यकता आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 314 खासदारांचे बळ आहे. यात भाजपाचे 273 आणि मित्रपक्षाचे 41 खासदार आहेत. विरोधकांकडे कॉंग्रेस (48), तृणमूल काँग्रेस (34), तेलगू देसम (16) व अन्य पक्ष (49) असे मिळून 147 खासदारांचे बळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com