मंत्री फ्रांसिस डिसोझा उपचारास लिलावती रुग्णालयात दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

राज्याचे नगरपालिकामंत्री फ्रांसिस डिसोझा हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना मुंबईतील लिलावती इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गोवा - राज्याचे नगरपालिकामंत्री फ्रांसिस डिसोझा हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना मुंबईतील लिलावती इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यात गेल्या 19 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले असले तरी ते सभागृहात उपस्थित राहू शकलेले नाहीत. 

सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाला भाजपचे तीन मंत्री फ्रांसिस डिसोझा, सार्वजनिक बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर व वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हे अनुपस्थित आहेत. मंत्री मडकईकर हे सुद्धा एक महिन्यापासून अधिक काळ मुंबईतील इस्पितळात उपचार घेत आहेत. मंत्री ढवळीकर हे सुद्धा मुंबईत उपचार घेऊन गोव्यात परतले असले तरी डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याने अधिवेशनाला येऊ शकलेले नाहीत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Minister Francis DSouza admitted to hospital