मोदींना संपवण्यासाठी काँग्रेसनं पंजाबमध्ये रचला होता कट; केंद्रीय मंत्र्याचा धक्कादायक आरोप I Giriraj Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Giriraj Singh On PM Modi

राहुल गांधींनी लंडनला जाऊन भारताचा, लोकशाहीचा आणि भारतीय संसदेचा अपमान केला आहे.

Giriraj Singh : मोदींना संपवण्यासाठी काँग्रेसनं पंजाबमध्ये रचला होता कट; केंद्रीय मंत्र्याचा धक्कादायक आरोप

Giriraj Singh On PM Modi : भाजप खासदार गिरीराज सिंह यांनी काँग्रेस पक्षावर (Congress Party) गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, 'काँग्रेसला पंतप्रधान मोदींना मारायचं आहे.'

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींचा दाखला देत गिरीराज सिंह म्हणाले, काँग्रेसकडं आता कोणताच मुद्दा नाही, म्हणून अदानींचा मुद्दा लावून धरला आहे. काँग्रेसला वारंवार मोदींना शिव्या द्याव्या लागत आहेत. आता हे लोक मोदी नष्ट होतील, तरच हे सरकार संपेल, असं म्हणत आहेत.

'मोदींना मारण्याची सर्व तयारी केली होती'

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह पुढं म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये गेले होते, तेव्हा त्यांना समुद्रकिनारी उड्डाणपुलावर थांबवण्यात आलं आणि मोदींना मारण्याची सर्व तयारी करण्यात आली होती. काँग्रेसनं आता त्यांच्या मृत्यूची चर्चा सुरू केली आहे, असाही आरोप त्यांनी केला.

राहुल गांधींवर हल्लाबोल

याशिवाय, गिरीराज सिंह काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल करताना दिसले. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राहुल गांधींनी लंडनला जाऊन भारताचा, लोकशाहीचा आणि भारतीय संसदेचा अपमान केला आहे. संसदेच्या या अधिवेशनात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडं राहुल गांधींवर कारवाईची मागणी केलीये.