बेळगावातून लवकरच बारा शहरांना विमान फेऱ्या - जयंत सिन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

सांबरा - उडान योजनेंतर्गत बेळगावच्या सांबरा विमानतळावरून १० ते १२ शहरांना विमान फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री जयंत सिन्हा यांनी दिली, मात्र कोणत्या शहरांना आणि केव्हा या सेवा सुरू होतील, याबाबत त्यांनी कोणतीच माहिती दिली नाही.

सांबरा विमानतळावर रविवारी (ता. २) सकाळी विकासकामांचा आढावा घेतला. सांबरा विमानतळाचा उडानच्या तिसऱ्या योजनेत समावेश झाला आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणाहून विमान फेऱ्या वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विमानतळवरील स्वच्छता पाहून मंत्री सिन्हा यांनी आनंद व्यक्त केला. खासदार सुरेश अंगडी यांनी सांबरा विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करावी. शेती उत्पादन आणि कार्गो मालवाहू सेवा सुरू करावी, विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्राची बेळगावात स्थापना करावी, अशी मागणी केली. विमानतळावर उपलब्ध सुविधांची तसेच आगामी योजनांची माहिती संचालक राजेश कुमार मौर्य यांनी दिली. आमदार अनिल बेनके, चैतन्य कुलकर्णी, राजेंद्र हरकुनी उपस्थित होते.

Web Title: Minister Jayant Sinha comment