पर्रीकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं 'शुद्धीकरण' (व्हिडिओ)

पर्रीकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं 'शुद्धीकरण' (व्हिडिओ)

पणजी- गोव्याची राजधानी पणजी येथील कला अकादमीच्या वास्तूमध्ये माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या कारणास्तव या वास्तूत शांतता निर्माण व्हावी आणि या वास्तूचे शुध्दीकरण करण्याच्या हेतूने काही लोकांनी येथे वास्तुशांती आणि शुध्दीकरणासाठी हवन करण्याचा घाट घातला असल्याचे सत्य उघडकीस आले आहे.

काही लोकांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करत सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांसमोर आणला. ज्या नेत्याने शेवटच्या श्‍वासापर्यंत गोव्याची काळजी केली, त्या नेत्यासाठी सरकारी वास्तूत घालण्यात आलेल्या या अशाप्रकारच्या हवन आणि पुजेला थोतांड आणि सनातनी असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्यक्‍त केल्या जात आहेत. 



दरम्यान, गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री तसेच कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी या प्रकाराबद्‌दल आपणास माहिती नसल्याची कबुली दिली. कला अकादमीसारख्या सरकारी वास्तूमध्ये परस्पर असले थोतांड प्रकार केले जात असल्याची बाब निंदनीय आहे. या प्रकाराबाबत कडक चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचेही मंत्री गावडे म्हणाले. 

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कधीच कोणत्याच अंधश्रध्देला आजीवन जोपासले नव्हते आणि त्यांच्या मृत्यूनंतर अशाप्रकारची विधी करणे लज्जास्पद असल्याच्या प्रतिक्रियाही देशभरातून सोशल मिडीयावर वाचायला मिळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com