समाजवादी पक्षातून मंत्री पवन पांडे निलंबित

वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

लखनौ - विधान परिषदेचे आमदार आशु मलिक यांच्या श्रीमुखात मारणारे मंत्री पवन पांडे यांना सहा वर्षांसाठी समाजवादी पक्षातून (सप) निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी दिली.

लखनौ - विधान परिषदेचे आमदार आशु मलिक यांच्या श्रीमुखात मारणारे मंत्री पवन पांडे यांना सहा वर्षांसाठी समाजवादी पक्षातून (सप) निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी दिली.

उत्तर प्रदेशात यादव कुटुंबात कलह सुरु असून, आज (बुधवार) शिवपाल यादव यांनी पत्रकार परिषद घेत पवन पांडे यांना निलंबित करत आल्याचे जाहीर केले. उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून काका शिवपाल यादव व पुतण्या अखिलेश यादव यांच्यात वाद सुरु आहेत. पक्षविरोधी कारवायांमुळे अखिलेश यादव यांनी नुकतेच शिवपाल यादव यांच्यासह तीन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. शिवपाल यांच्या समर्थनार्थ मुलायमसिंह यादव उतरले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिवपाल यादव म्हणाले, की आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पवन पांडे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षात अशा घटनांना खपवून घेण्यात येणार नाही. पवन पांडे यांना मंत्रिमंडळातूनही काढून टाकण्यात यावे, अशी मागणी अखिलेश यांच्याकडे करणार आहे. आमच्या पक्षात फूट पडली नसून, आमचे कुटुंब एक आहे.

Web Title: UP Minister Pawan Pandey expelled from Samajwadi Party for six years for indiscipline