राजकीय चर्चेसाठी 'यांनी' घेतली पर्रिकरांची भेट

Minister Vijai Sardesai met Parrikar for political discussions
Minister Vijai Sardesai met Parrikar for political discussions

पणजी : गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. राजकीय चर्चेसाठी ही भेट होती, असे सरदेसाई यांनी नंतर सांगितले.

सरदेसाई यांनी सरकार अल्पमतात आले तर ते वाचवण्यासाठी आपल्याकडे पर्याय तयार असल्याचे गेल्या आठवड्यात सांगितले होते. गोव्याच्या ४० सदस्यीय विधानसभेत तीन जागा रिक्त आहेत. काँग्रेसचे सर्वाधिक १४ आमदार आहेत. त्या खालोखाल भाजपचे १३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ३, गोवा फॉरवर्डचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ तर तीन अपक्ष आमदार आहे. यापैकी केवळ काँग्रेस विरोधात आहे.

आमदार अॅड फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे भाजपची आमदार संख्या काँग्रेसपेक्षा घटली आहे. त्यामुळे मगोच्या मदतीने काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करू शकेल, असे वातावरण आहे. तसा त्यांनी याआधी चारवेळा सरकार स्थापनेचा दावा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे केला होता.

सरदेसाई यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना विचारले असता ते म्हणाले, आमची राजकीय चर्चा झाली. त्यात सरकार वाचवण्यासाठी पर्यायांवरही चर्चा झाली. मात्र याविषयी अधिक माहिती देणे त्यांनी टाळले. मुख्यमंत्र्यांच्या आजाराविषयी मात्र ते बोलले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com