India Export: सलग तिसऱ्या महिन्यात भारताची निर्यात घटली

अकरा महिन्यांतील निर्यात वाढली
Ministry of Commerce India merchandise exports fell third consecutive month delhi
Ministry of Commerce India merchandise exports fell third consecutive month delhi sakal

नवी दिल्ली : भारताची वस्तू निर्यात फेब्रुवारीमध्येही सलग तिसऱ्या महिन्यात घटली असून ती या फेब्रुवारीत मागील वर्षाच्या फेब्रुवारी पेक्षा ८.८ टक्के कमी झाली आहे.

मात्र यावर्षीच्या पहिल्या अकरा महिन्यांतील एकूण निर्यात साडेसात टक्क्यांनी वाढली आहे.

Ministry of Commerce India merchandise exports fell third consecutive month delhi
Mumbai News : जेष्ठ नागरिकांना धक्का मारत, चाकूचा धाक दाखवून लुटणार सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात

केंद्रीय व्यापार मंत्रालयाने आज हा तपशील जाहीर केला आहे. त्यानुसार मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात भारताची निर्यात ३७.१५ अब्ज अमेरिकी डॉलर एवढ्या मूल्याची होती. या फेब्रुवारीत ती ३३.८८ अब्ज डॉलर एवढ्या मूल्याची झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात भारताची आयातही ८.२१ टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षीच्या फेब्रुवारीतील आयात ५५.९ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी होती. तर यावर्षीच्या फेब्रुवारीत ती ५१.३१ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याची झाली आहे.

त्यामुळे फेब्रुवारीत भारताच्या आयात निर्यात व्यापारातील तूटही घटून १७.४३ अब्ज डॉलर झाली आहे. पण ती जानेवारी महिन्यातील १६.५६ अब्ज डॉलर तुटीच्या तुलनेत जास्त आहे.

एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत भारताची एकंदरीत व्यापारी निर्यात (वस्तू आणि सेवा) मागील वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीपेक्षा ७.५ टक्क्यांनी वाढून ती ४०५.९४ अब्ज डॉलर पर्यंत गेली आहे.

Ministry of Commerce India merchandise exports fell third consecutive month delhi
Pune News : पुणे सोलापुर महामार्गावर अपघात; एक ठार तर दोन जखमी

तर याच कालावधीतील आयातही १८.८२ टक्क्यांनी वाढवून ती ६५३.४७ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याइतकी झाली आहे.

त्यामुळे या आर्थिक वर्षातील भारताच्या आयात निर्यात व्यापारातील तूट ही मागील वर्षीच्या पहिल्या अकरा महिन्यांच्या तुलनेत ४३.५ टक्क्यांनी वाढून ती २४७.५३ अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com