माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं Twitter अकाउंट हॅक

MIB Twitter Account Hacked
MIB Twitter Account HackedSakal

नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (Ministry of Information and Broadcasting) ट्विटर अकाऊंट (Ministry of Information and Broadcasting Twitter Account Hacked) आज बुधवारी सकाळच्या सुमारास हॅक करण्यात आले. हॅकर्सनी या खात्याचे नाव 'एलॉन मस्क' असे ठेवले. त्यावरून ग्रेट जॉब असं ट्विट देखील केलं होतं. याबाबत मंत्रालयानं माहिती दिली आहे. त्यामुळे आता सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

MIB Twitter Account Hacked
पंतप्रधान मोदींचं Twitter अकाउंट हॅक; सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

हॅकर्सने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं ट्विटर अकाऊंट आज सकाळी हॅक केलं. त्यावरून एक मोठा कार्यक्रम होणार आहे, असं ट्विट केलं. त्यानंतर काही फसव्या लिंक देखील या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आल्या होत्या. पण, काही वेळातच मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तसेच हॅकर्सने केलेले ट्विट हटवले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अकाऊंटवरून हॅकर्सने केलेले ट्विट
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अकाऊंटवरून हॅकर्सने केलेले ट्विटIndia Today

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट झालं होतं हॅक -

गेल्या १२ डिसेंबरला पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. मोदींच्या अकाउंटवरून मध्यरात्री २ वाजून ११ मिनिटांनी बीटकॉईन संबंधित एक फसवं ट्विट करण्यात आलं होतं. भारताने बीटकॉईनला कायदेशीर मान्यता दिल्याचं या ट्विटमधून म्हटलं होतं. सरकारने ५०० बीटकॉईनची खरेदी केली असून देशवायिसांना दिले जाईल,असं हे ट्विट होतं. पण, काही वेळातच या अकाऊंटवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com