झारखंडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

आम्ही या बलात्कारप्रकरणी एफआयआर दाखल केली असून, दोन प्रौढ आरोपींसह पाच किशोरवयीन मुलांविरोधात संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून, यातील किशोरवयीन मुलांना रिमांड होमला पाठविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चायबसा : 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना झारखंडमधील चायबसा येथे घडली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये पाच जण किशोरवयीन मुले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आली. या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाच किशोरवयीन मुलांपैकी एकाला चौकशीसाठी रिमांड होमला पाठविण्यात आले. तसेच यातील आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना 26 जुलैला घडली असून, या पीडित मुलीच्या कुटुंबियांनी याप्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.  

दरम्यान, आम्ही या बलात्कारप्रकरणी एफआयआर दाखल केली असून, दोन प्रौढ आरोपींसह पाच किशोरवयीन मुलांविरोधात संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून, यातील किशोरवयीन मुलांना रिमांड होमला पाठविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Minor gang raped by 7 including 5 juveniles in Jharkhands Chaibasa