पोलिसांनी कारवाईला नकार दिल्याने बलात्कार पीडितेची आत्महत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

उत्तरप्रदेशमधील बदायूँ जिल्ह्यात एका गावात अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाईला नकार दिला म्हणून त्या पीडित मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी ती मुलगी या मुलांना ओळखत होती व तिच्या सहमतीनेच सर्व झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

बदायूँ (उत्तर प्रदेश) - उत्तरप्रदेशमधील बदायूँ जिल्ह्यात एका गावात अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाईला नकार दिला म्हणून त्या पीडित मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी ती मुलगी या मुलांना ओळखत होती व तिच्या सहमतीनेच सर्व झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

पीडित मुलीचा आरोप होता की, तिला तिघेजण तिथल्या प्राथमिक शाळेत घेऊन गेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला या घटनेबद्दल बाहेर कोणाकडे न बोलण्यासाठी धमकी दिली गेली. दरम्यान, मंगळवारी (ता. 21) पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली होती की, मुलगी शौचालयाला बाहेर गेली असता, तिच्यावर प्राथमिक शाळेत नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला यासंदर्भात ताब्यातही घेतले होते, परंतु, चौकशी दरम्यान पीडित मुलीच्या सहमतीने झाले असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी मुलीचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठवले आहे, अशा घटनांनी उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने डोके वर काढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Minor girl who alleged gang rape in Badaun school commits suicide after polices refutal