'मिस इंडिया'सोबत भररस्त्यात छेडछाड; फेसबुकवरून वाच्यता

miss india universe and mode Ushoshi Sengupta
miss india universe and mode Ushoshi Sengupta

कोलकाता : काही तरुणांनी आपल्याशी भररस्त्यात गैरवर्तन केल्याचा आरोप माजी मिस इंडिया युनिवर्स आणि मॉडेल-अभिनेत्री उशोशी सेनगुप्ताने केला आहे. उशोशीने फेसबुकवरुन घडलेल्या प्रकाराची वाच्यता केली.

उशोशी सेनगुप्ताने फेसबुकवरून केलेल्या वाच्यतेनंतर कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल न केल्यामुळे कोलकाता पोलिस आयुक्तांनी तपासाचे आदेश दिले आहेत. उशोशी सेनगुप्ताने 2010 साली मिस इंडिया युनिवर्सचा किताब पटकावला होता.

उशोशी सेनगुप्ताने लिहिलेली पोस्ट-
'17 जून रोजी मी माझे काम संपवून सहकाऱ्यासोबत उबेरने घरी जात होती. काही तरुण माझ्या मोटारीच्या बाजूने जात होते आणि त्यांची दुचाकी मोटारीला धडकली. माझ्या चालकाला शिवीगाळ करत ते मोटारीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करू लागले. जवळपास 15 तरुण तिथे जमले होते. त्यांनी जेव्हा चालकाला मारायला सुरुवात केली तेव्हा मी मोटारीमधून उतरले व त्यांचा व्हिडिओ शूट केला. तिथून थेट पोलिस स्टेशनला धाव घेतली. एका पोलिस अधिकाऱ्याला माझ्यासोबत येण्यास सांगितले तेव्हा त्याने तो विभाग त्याच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. त्यांच्यासमोर विनवणी केल्यानंतर ते माझ्यासोबत आले व तरुणांना जाब विचारला. हल्लेखोरांनी पोलिसांना धक्का दिला व तेथून पळ काढला. त्यानंतर मला व सहकाऱ्याला घरी सोडण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांकडे रितसर तक्रार नोंदवण्याचा विचार केला. पण ते तरुण माझ्या मोटारीचा पाठलागच करत होते. तीन दुचाकीस्वारांनी माझी मोटार थांबवली, मोटारीवर दगड फेकले. मला मोटारीमधून खेचून बाहेर काढले आणि माझा फोन तोडण्याचा प्रयत्न केला. कारण त्यामध्ये मी त्यांचा व्हिडिओ शूट केला होता. मी आणि माझ्या सहकाऱ्याने मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूचे लोक तिथे जमा झाल्यावर तरुणांनी पुन्हा पळ काढला.'

दरम्यान, उशोशीने लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. घटनाप्रसंगी पोलिसांनी योग्य वेळी योग्य ती मदत केली नसल्याची तक्रारही तिने पोस्टमध्ये केली आहे. या घटनेकडे आम्ही गंभीरपणे पाहात असून, सात जणांना अटक केली आहे,' अशी माहिती कोलकाता पोलिसांनी उशोशीच्या पोस्टवर दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com