दिल्लीत येते गोव्याची आठवण- पर्रीकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मी पक्षाचा आदेश मानणारा आहे. पक्ष देईल तो आदेश पाळून काम करणार. दिल्लीत माझे चार किलो वजन कमी झाले आहे. याचे मुख्य कारण जेवण आहे. गोव्यात भाजपला 2/3 बहुमत मिळेल.

पणजी - मी पुन्हा गोव्यात परतण्याबाबत पक्षच निर्णय घेईल. पण, दिल्लीत असूनही मला गोव्याच खाण आवडते. तुम्हाला जो अर्थ काढायचा असेल तो काढा, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

गोव्यात आज (शनिवार) विधानसभेसाठी मतदान होत आहे. पर्रीकर यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजाविला. गोव्यात पुन्हा भाजप सत्तेत आल्यास पर्रीकर यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याविषयी बोलताना पर्रीकर यांनी गोव्याला विसरु शकत नाही, असे म्हटले आहे.

पर्रीकर म्हणाले, की मी पक्षाचा आदेश मानणारा आहे. पक्ष देईल तो आदेश पाळून काम करणार. दिल्लीत माझे चार किलो वजन कमी झाले आहे. याचे मुख्य कारण जेवण आहे. गोव्यात भाजपला 2/3 बहुमत मिळेल. यावेळी 85%च्या जवळपास मतदान होण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजपने केलेली विकास कामे जनतेला पसंत पडल्याने आमचा विजय निश्चित आहे.

Web Title: Missing Goan food, says Parrikar dodges questions on returning to state as CM