मतं जुळविण्यासाठी 'जय जवान, जय किसान'चा गैरवापर : काँग्रेस

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 जून 2018

'जय जवान, जय किसान'चा भाजपकडून गैरवापर करण्यात येत आहे.

- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राइकची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या मुद्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टीका केली. ते म्हणाले, 'जय जवान, जय किसान'चा भाजपकडून गैरवापर करण्यात येत आहे. तर मोदी सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत मतांची जुळवाजुळव केली जात आहे, असेही ते म्हणाले. 

सुरजेवाला म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात लष्कराने अनेक मोठ्या कारवाया केल्या होत्या. या सर्व कारवाया यशस्वीपणे करण्यात आल्या. मात्र, त्यांनी याचा फायदा घेतला नाही. पण आता मोदी सरकारने केलेल्या या कारवाईचा फायदा घेतला जात आहे. तसेच मतांसाठी भाजपकडून 'जय जवान, जय किसान'चा गैरवापर केला जात असून, मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या कारवाईचा मुद्दावरून मतांची जुळवाजुळव केली जात आहे, असे सुरजेवाला म्हणाले.

Web Title: Misusing the word Jai Jawan Jai Kisan says Congress