मिथिला डहाके ठरल्या ब्युटीफुल स्माईलच्या मानकरी

रवींद्र जगधने
गुरुवार, 3 मे 2018

मिथिला या मूळच्या नागपूरच्या असून, त्यांनी एचआर अँड फायनान्स या शाखेत (एमबीए) पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातही काही काळ काम केले असून, हवाई सुंदरीचे प्रशिक्षणही पूर्ण केले.

पिंपरी : मिसेस इंडिया क्विन ऑफ सबस्टंस 2018 च्या अंतिम फेरीत पिंपळे सौदागर येथील मिथिला वराडे-डहाके यांना ब्युटिफुल स्माईल सन्मानाने गौरविण्यात आले. देश-विदेशातील हजारो महिलांमधून निवड झालेल्या 46 जणींची अंतिम फेरी नुकतीच झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील चार महिलांचा समावेश होता. 

मिथिला या मूळच्या नागपूरच्या असून, त्यांनी एचआर अँड फायनान्स या शाखेत (एमबीए) पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातही काही काळ काम केले असून, हवाई सुंदरीचे प्रशिक्षणही पूर्ण केले. त्या सध्या एका मल्टिनॅशनल कंपनीत मानव संसाधन विभागात एचआर एक्झिक्युटिव्ह पदावर काम करत आहेत. त्यांचे वडील महावितरणमध्ये नोकरी करतात तर आई शिक्षिका आहेत. 

मिथिला म्हणाल्या, "अडीच वर्षाची मुलगी, घर, संसार व काम सांभाळत या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी माझी निवड होणे, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. स्पर्धेच्या काळात मला मिळालेला अनुभव माझ्या आयुष्यासाठी खूप प्रेरणादायी असून मला दिलेल्या टास्कमध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे जवळून काम पहात आले.''

Web Title: Mithila Dahake judges beautiful beauty Smile