कोंबडीचे पिल्लू घेऊन चिमुकला गेला रुग्णालयात...

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

मिझोरममधील एका लहान मुलाबद्दलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ऐझाल (मिझोराम): सोशल मीडियावरून कोण कधी व्हायरल होईल अथवा ट्रोल होईल सांगता येत नाही. नेटिझन्स चांगली पोस्ट जरूर शेअर करताना दिसत असून, येथील एका चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  

लहान मुले ही निरागस असतात. मुलांमध्ये असणारा हा निरागसपणा अनेकदा मोठ्यांमध्ये हरवल्यासारखा वाटतो. म्हणूनच चूक झाल्यानंतर अनेकदा वादविवाद न करता मुले निरागसपणे माफी मागतात. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. मिझोरममधील एका लहान मुलाबद्दलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टमधील माहितीनुसार, साईरंग भागातील लहान मुलगा सायकल चालवत होता. शेजारच्यांनी पाळेल्या कोंबडीचे एक पिल्लू त्याच्या सायकलच्या चाकाखाली आले अन् जखमी झाले. या प्रकराननंतर हा मुलगा त्या कोंबडीच्या पिल्लाला हातात घेऊन जवळच्या रुग्णालयात गेला. जवळ असलेले पैसे देत या पिल्लावर उपचार करा, असे त्याने रुग्णालयात सांगितले.

दरम्यान, कोंबडीचे पिल्लू हातात घेतलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, अनेकांनी या मुलाच्या निरागसपणाचे कौतुक केले आहे. नेटिझन्सनी निरागस मुलाचे कौतुकही केले आहे.

Web Title: mizoram boy mistakenly runs over chicken with cycle takes it to hospital