'भारतात होणारी रोहिंग्या मुस्लिमांची घुसखोरी रोखा'

वृत्तसंस्था
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

म्यानमारमधील राखीन राज्यातून रोहिंग्या मुस्लिम व दहशतावाद्यांनी म्यानमारमध्ये घुसखोरी केल्यास राज्यात गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली

ऐझाल - म्यानमारमधून ईशान्य भारतात होणारी रोहिंग्या मुस्लिमांची घुसखोरी रोखण्यासाठी मिझोराम-म्यानमार सीमेवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याची विनंती मिझोरामचे मंत्री लाल तान्हेवाला यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना केली. 

लाल तान्हेवाला यांनी मंगळवारी राजनाथसिंह यांची भेट घेतली. त्या वेळी सीमेवरील सुरक्षेसंदर्भात त्यांनी चर्चा केली. म्यानमारमधील राखीन राज्यातून रोहिंग्या मुस्लिम व दहशतावाद्यांनी म्यानमारमध्ये घुसखोरी केल्यास राज्यात गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. म्यानमारच्या सैन्याने तेथील अराकान दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई सुरू केल्याने गेल्या नोव्हेंबरपासून दक्षिण मिझोराममधील लॉंगतलाई जिल्ह्यात म्यानमारच्या सोळाशे नागरिकांनी आश्रय घेतला आहे, अशी माहिती राज्याच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

 

Web Title: mizoram rohingya muslims myanmar