#MeToo वादग्रस्त मंत्री एम. जे. अकबर यांचा अखेर राजीनामा

MJ Akbar Resign from their Post of Minister
MJ Akbar Resign from their Post of Minister

नवी दिल्ली : लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर आज (बुधवार) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याबाबतचा निर्णय त्यांनी पत्रकाद्वारे सांगितला.

संपादक असताना अकबर यांनी लैंगिक शोषण केले होते, असा आरोप काही महिला पत्रकारांनी केला होता. तेव्हापासून अकबर यांच्यावर विरोधीपक्षांकडून टीका करण्यात येत होती. ही बाब समोर आल्यानंतर देशभरात #MeToo मोहीम सुरु करण्यात आली. तसेच राज्यमंत्री अकबर परदेश दौऱ्यावर असताना त्यांना केंद्र सरकारने तातडीने भारतात परतण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अकबर यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतले होते. 

दरम्यान, अकबर यांनी नैतिकेनुसार आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेससह विविध पक्षाने केली होती. त्यानंतर आज अखेर अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

अब्रुनुकसानीच्या खटल्याची सुनावणी उद्यापासून

ज्या महिलांनी अकबर यांच्यावर आरोप केले होते, त्यांच्यावर अकबर यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. यापैकी एका खटल्याची सुनावणी उद्यापासून (ता.18) सुरु होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com