नवी दिल्ली : विदर्भातील काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी "'मला घरी परतल्यासारखे वाटत आहे,'' अशी प्रतिक्रिया ट्विटरवरुन व्यक्त केली.
आशिष देशमुख यांनी नुकताच भाजपला रामराम केला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये जाणार असे बोलले जात होते. अखेर आज सकाळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आशिष देशमुख यांच्याबरोबरच भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांचे पूत्र मानवेंद्र सिंह यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आशिष देशमुख मागील काही महिने भाजपवर सातत्याने टीका करत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपच्या शेतकरी धोरणांच्या विरोधात ठिय्या आंदोलनही केले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.