आमदाराने काश्मीर नसलेला नकाशा केला फेसबुकवर पोस्ट; गुन्हा दाखल

MLA Shanimol Usman Posting Wrong Map of India on Facebook
MLA Shanimol Usman Posting Wrong Map of India on Facebook

अलप्पुझा : स्वातंत्र्य दिनानिमीत्त (Independence Day) शुभेच्छा देताना केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराने काश्मीर नसलेला भारताचा नकाशा फेसबुकवर (MLA Posting Wrong Map of India on Facebook) पोस्ट केला होता. याप्रकरणी आमदाराविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार शनिमोल उस्मान (Shanimol Usman) माकपाचे आमदार आहेत. अलप्पुझा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक पी एस बाबू (P S Babu) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला आमदारांविरोधात तक्रार मिळाली असून आम्ही गुन्हा नोंद करुन घेतला आहे. पुढील तपास चालू असून लवकरच तपास पूर्ण होईल असेही बाबू यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून बोलताना आमदार उस्मान (Shanimol Usman) यांनी काश्मीर नसलेला भारताचा नकाशा फेसबुकवर पोस्ट करत संविधानाच्या शपथेचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. यावर फेसबुक पेजच्या अॅडमिनिस्ट्रेटर ने स्पष्टीकरण दिले असून दिलगिरी व्यक्त केली आहे. यावेळी दिलेल्या स्पष्टीकरणात काश्मीर नसेला भारताचा नकाशा हा चूकीने पोस्ट करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com