महिला आमदाराची केरळमध्ये हकालपट्टी

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

आलप्पुझा - केरळमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या धडाडीच्या महिला आमदार ई. एस. बिजीमोल यांना वादग्रस्त वक्तव्य भोवले असून, त्यांची पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आलप्पुझा - केरळमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या धडाडीच्या महिला आमदार ई. एस. बिजीमोल यांना वादग्रस्त वक्तव्य भोवले असून, त्यांची पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बिजीमोल या इड्डुकी जिल्ह्यातील पीरमेडू मतदासंघातून दोन वेळा निवडून आल्या आहेत. तसेच, पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पक्षात आपल्याला कोणताही "गॉडफादर' नसल्याचे वक्तव्य केले होते. या प्रकरणी पक्षाने त्यांच्याकडून खुलासा मागविला होता. त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये सत्तेत सहभागी असून, राज्यातील संख्याबळात पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Web Title: mla women suspend by indian communist party